तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासानिमित्त यंदा कर्णफुल आणि पायल महोत्सव

मनोज जोशी
Wednesday, 23 September 2020

घेरदार फ्रॉक, डोक्यावर मुकुट, परीचे पंख, जादूची छडी व संगीताच्या ठेक्यावर हातात सोन्याची कर्णफुले व चांदीच्या पायल घेऊन छोट्या छोट्या मुली विसपुते सराफी पेढीवर अवतरल्या.

कोपरगाव (अहमदनगर) : घेरदार फ्रॉक, डोक्यावर मुकुट, परीचे पंख, जादूची छडी व संगीताच्या ठेक्यावर हातात सोन्याची कर्णफुले व चांदीच्या पायल घेऊन छोट्या छोट्या मुली विसपुते सराफी पेढीवर अवतरल्या. टाळ्यांचा गजर घुमला. निमित्त होते विसपुते सराफी पेढीने अधिक महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या कर्णफुल आणि पायल महोत्सवाच्या उद्घाटनाचे!

तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासानिमित्त यंदा कर्णफुल आणि पायल महोत्सवाचे उद्घाटन छोट्या मुलींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. लेटेस्ट व्हारायटीची कर्णफुले आणि आकर्षक पायलचे अनावरण दिशा लाडे, आनंदी चव्हाण, तेजस्विनी सरोदे, आराध्या भडकवाडे, मायरा भाकरे, निहारिका शिंदे, भार्गवी सरोदे, माही रोडे, दिव्यांशी लाडे, वैष्णवी भडकवाडे, सिद्धी कवडे, समृद्धी भडकवाडे, सायली बाळकाई, देवयानी दुपारगुडे, स्वामींनी काळे, समृद्धी पंडोरे, परिणीता कुलकर्णी, पुर्वा भोंगळे, ओवी लाडे या चिमुरड्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रेरणा सरोदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या महोत्सवात जुनी कर्णफुले आणि जुन्या पायल देऊन नवीन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय कर्णफुल आणि पायलच्या प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तु दिली जात आहे. तरी या संधीचा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक दीपक विसपुते यांनी केले. 

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पेढीचे युवा संचालक यश विसपुते यांनी केले. दीपक विसपुते आणि पूनम विसपुते यांच्या हस्ते सर्व मुलींना भेटवस्तू आणि पुस्तक भेट देण्यात आली. आभार प्रेम विसपुते यांनी मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Festival on the occasion of Adhikamasani in Kopargaon