धनगंगा पतसंस्थेला ४८ लाखांना चुना, व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

2017मध्येही संचालकांच्या संगनमताने 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

संगमनेर ः कर्जफेड न करता, तारण ठेवलेल्या मालमत्तेची परस्पर विक्री केली, तसेच ठेवीदारांच्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करून घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेची 48 लाख 60 हजार 247 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संस्थेचे लेखापरीक्षक अजय राऊत यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेचे 2018-19मध्ये लेखापरीक्षण केले होते. व्यवस्थापक कवडे याने पत्नीच्या नावे 40 लाख रुपये कर्ज घेतले. त्यासाठी पारेगाव बुद्रुक येथील मालमत्ता संस्थेकडे तारण ठेवली होती. मात्र, नंतर कवडे याने कर्ज न भरताच, बोगस "नील' दाखला तयार करून घेतला व तारण ठेवलेली मालमत्ता परस्पर विक्री केल्याची बाब समोर आली.

हेही वाचा - शरद पवारांना पंतप्रधान झालेलं पहायचंय, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा संकल्प

तारण ठेवलेले सोने कर्जदारांना परत मिळाले नसल्याचे समोर आले. संचालक मंडळाला अंधारात ठेवून, व्यवस्थापक कवडे याने सोनेतारण कर्जप्रकरणात 2 लाख 12 हजार 980 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले. 

दरम्यान, 2017मध्येही संचालकांच्या संगनमताने 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

आता नव्याने उघड झालेल्या प्रकरणामुळे संस्थेत सुमारे 4 कोटी 40 लाख 21 हजार 541 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against the Dhanganga credit union manager