esakal | खाकीला कलंक! भावी डाॅक्टर तरुणीवर अत्याचार; पोलिसावर अत्याचार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

police

खाकीला कलंक! पोलिसावर अत्याचारासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका भावी डाॅक्टर तरुणीवर वारंवार शारिरिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिस शिपाई तुळशीराम वायकर याच्यासह आणखी दोन महिलाविरुद्ध येथील शहर पोलिस ठाण्यात शारिरिक अत्याचार करुन जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. ३) रात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर येथील पोलिस उपाधिक्षक राहुल मदने अधिक तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस शिपाई फरार

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस शिपाई वायकर फरार झाला. असून शहर पोलीस पथकाकडुन त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, पोलिस शिपाई वायकर याचे पाच वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पिडीत तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित झाले होते. त्यानंतर वायकर याने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून श्रीरामपूरसह शिर्डी व बाभळेश्वर येथे वारंवार शारिरीक अत्याचार करुन गर्भपात करण्यास भाग पाडले. पुढे ही बाब पिडीतेने वायकर याच्या घरी सांगितली. त्यावेळी वायकर याचा पहिला विवाह झाला असल्याचे उघड झाले. त्यामुळे वायकरसह त्याच्या आईने व पत्नीने पिडीतेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

loading image
go to top