esakal | अखेर आजपासून शनिमंदिर दर्शनासाठी बंद; गुढीपाडवा यात्रा व सप्ताह सोहळा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Finally Shanimandir has been closed for Darshan from today

महाद्वार समोरील दर्शन रांगेत संरक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. ध्वनिक्षेपकावरुन याबाबत ग्रामस्थ, व्यावसायिक व भाविकांना सूचना देण्यात आली. 

अखेर आजपासून शनिमंदिर दर्शनासाठी बंद; गुढीपाडवा यात्रा व सप्ताह सोहळा रद्द

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : प्रशासनाच्या आदेशानुसार आज पहाटेच्या आरती सोहळ्यानंतर शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. याशिवाय गुढीपाडवा यात्रा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. 

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने एकत्रित निर्णय घेवून आज सोमवारच्या पहाटे आरती सोहळा झाल्यानंतर दर्शन व्यवस्था बंद केली आहे. महाद्वार समोरील दर्शन रांगेत संरक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. ध्वनिक्षेपकावरुन याबाबत ग्रामस्थ, व्यावसायिक व भाविकांना सूचना देण्यात आली. 

याशिवाय १३ एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा यात्रा, कावड मिरवणूक व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला आहे. या बैठकिस देवस्थान अध्यक्ष बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, तांत्रिक अधिकारी नितीन शेटे, माजी सरपंच बाळासाहेब बानकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.