esakal | लॉन, मंगल कार्यालयांच्या चालकांपुढे आर्थिक संकट 
sakal

बोलून बातमी शोधा

Financial crisis in front of the operators of Lawn offices

दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील लॉन, मंगल कार्यालयांत रंगणारा गरबा या वर्षी पाहायला मिळणार नाही.

लॉन, मंगल कार्यालयांच्या चालकांपुढे आर्थिक संकट 

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्‍यात दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील लॉन, मंगल कार्यालयांत रंगणारा गरबा या वर्षी पाहायला मिळणार नाही. कोरोनामुळे शहरातील लॉन, मंगल कार्यालये आठ महिन्यांपासून बंद आहेत. ते उघडण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने लॉन, मंगल कार्यालयांच्या चालकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

मंगल कार्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील लॉन आणि मंगल कार्यालयांच्या चालकांची संघटनादेखील नाही. कोरोनामुळे लॉन, मंगल कार्यालये बंद आहेत. देखभाल- दुरुस्ती खर्च, वीजबिल, कामगारांचे पगार, पाणीपट्टी हा खर्च चालकांना करावाच लागतो. लॉन आणि मंगल कार्यालये लवकर सुरू न झाल्यास ती बंदच करावी लागतील. त्यामुळे सरकारने लॉन आणि मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अगस्ती मंगल कार्यालयाचे बाळासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे. 

सरकारने 50 नागरिकांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली; मात्र मोजक्‍या उपस्थितीमुळे मंगल कार्यालये, लॉन यांची आगाऊ नोंदणी (बुकिंग) कोणी करीत नाही. किमान 150 ते 200 नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली तरच लॉन, मंगल कार्यालये सुरू होतील, असे सुरेश कानकाटे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image