
अहमदनगर : मुलाच्या लग्नात गर्दीमुळे कर्डिलेंना दहा हजारांचा दंड
अहमदनगर : माजी मंत्री शिवाजी कर्डिले (ex minister shivaji krdile)यांचा मुलगा अक्षय यांचा विवाहसोहळा(wedding) बुधवारी (ता. २९) रात्री बुऱ्हाणनगर येथे पार पडला. या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे(corona rules) उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना दहा हजार रुपयांचा दंड भिंगार कॅम्प पोलिसांनी केला आहे. या विवाह सोहळ्यात सोन्याची चैन आणि दुचाकीचीही चोरी झाली आहे.
हेही वाचा: कोल्हापूरात वर्षभरात झाली ८६९ कोटींची गुंतवणूक
अक्षय कर्डिले यांच्या विवाहसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. या सोहळ्यास हजेरी लावल्यानंतर आमदार विखे कोरोनाबाधित असल्याचे त्यांनी जाहीर केले.या सोहळ्यात चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या वऱ्हाडीच्या गळ्यातील ९८ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली. अण्णा सोपान जगताप (रा. माथणी, ता. नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Fine At Rs 10000 For Crowd At Boys Wedding From Ex Minister Shivaji Kardile
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..