बोंबलत फिरणाऱ्यांना दीड लाखांचा दंड 

अमित आवारी
Sunday, 5 July 2020

शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत बोंबलत फिरणारे नागरिक व वेळेवर दुकाने न बंद करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. अडीच दिवसांतच महापालिकेच्या पथकाने दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

नगर : शहरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत बोंबलत फिरणारे नागरिक व वेळेवर दुकाने न बंद करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. अडीच दिवसांतच महापालिकेच्या पथकाने दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

अवश्‍य वाचा - राहुरीत व्यापाऱ्यांचा "आमदनी अठन्नी दंड भरा रुपय्या' 

महापालिकेचे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी शहरातील लॉकडाउनचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी व्हिजिलन्स स्क्वाड तयार केले आहे. या स्क्‍वाडने शहरातील लॉकडाउनचे नियमन न पाळणाऱ्या नागरिकांना अडीच दिवसांत एक लाख 42 हजार 600 रुपयांचा दंड केला आहे. 

या पथकाने आज सकाळी सिव्हिल हडको, प्रेमदान ते बोरुडे मळा, भूतकरवाडी, बंगाल चौकी, तेलीखुंट, कोठला चौक, माळीवाडा, दीपक हॉस्पिटल परिसर या ठिकाणी वेळेपूर्वी दुकान उघडण्या बद्दल व मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना 48 हजार 500 रुपयांचा दंड केला. शुक्रवारी (ता. 3) या पथकाने गंज बाजार, कापड बाजार, बागरोजा हडको, बागडपट्टी, मल्हारचौक, सारस नगर, गुलमोहोर रस्ता, बागडपट्टी भागात 34 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. शनिवारी (ता. 4) केडगाव, शाहू नगर, भूषण नगर,अं बिका नगर, चाणक्‍य चौक, आनंदऋषीजी हॉस्पिटल परिसर, सावेडी उपनगर, बालिकाश्रम रस्ता, तपोवन रस्ता, वाडिया पार्क भागात 59 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. अडीच दिवसात या पथकाने एक लाख 42 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे. पथकाकडून यापुढे कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले 

कारवाई करण्यासाठी व्हिजिलन्स स्क्वाड अधिकारी म्हणून पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, बाळासाहेब विधाते, महापालिका कर्मचारी विजय बोधे, गणेश लायचेट्टी, राहुल साबळे, बाळासाहेब पवार, अशोक बिडवे, राजेश आनंद, रवींद्र सोनावणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन, पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत खताडे, शरद गांगर्डे, ए.टी.वामन, जे.एल.लहारे, महादेव निमसे, नितीन फुलारी कारवाईत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fine of Rs 1.5 lakh for violating the rules