डॉक्टरकडून महिलेला गुंगीचे औषध... घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शांताराम जाधव
Saturday, 15 August 2020

उपचाराच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या डाँक्टरावर एका महिलेने फिर्याद करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील सारोळेपठार येथे घडली.

बोटा (अहमदनगर) : उपचाराच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवणाऱ्या डाँक्टरावर एका महिलेने फिर्याद करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील सारोळेपठार येथे घडली.

पिडीत महिला 25 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी साडेबारा वाजता टायफडच्या आजाराबाबत एका डॉक्टराने दिलेल्या उपचाराच्या सूचनेप्रमाणे सारोळेपठार येथे डॉ. सय्यद दाऊद मोमीन यांच्याकडे गेली. उपचारा दरम्यान डॉ. मोमीन यांनी सलाईनमधून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या महिलेवर बळजबरी करून तिची चित्रफित तयार केली. 
या चित्रफितीचा गैरफायदा घेत दोन वर्षात स्वतःच्या दवाखान्यात व संगमनेर येथे नेऊन शारीरिक संबंध ठेवले.

शनिवारी 8 जुलैला डॉ. मोमीन यांनी शारीरिक संबंधाची मागणी केली. तेव्हा पिडीत महिलेने विरोध केला. त्याचा राग आल्याने डॉ. मोमीन याने तिला मारहाण केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करीत तुझ्या नवऱ्याला खोटी गुन्ह्यामध्ये अडकवीन व मुलांच्या जीवीतास धोका निर्माण करण्याची धमकी दिली. यावरून डॉ. मोमीन यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR against a doctor at Ghargaon police station in Sangamner taluka for giving drugs