
अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार महेश लांडगे यांच्याविषयी आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्य करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी शहरातील व्यावसायिक नीलेश कन्हैयालाल बांगरे (वय ४१, रा. रविश कॉलनी, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.