पहिल्याच पावसात साडेतीन कोटी पाण्यात..

tapowan road
tapowan road
Updated on

नगर : सावेडीतील पाइपलाइन रस्त्याला समांतर असलेल्या, साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या तपोवन रस्त्याचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले. त्यामुळे सावेडीतील विकासाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्‍त झाला. मात्र, पहिल्याच पावसाने या रस्त्याच्या कामाची पोलखोल केली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावरचे डांबरीकरण उखडले, खडी उघडी पडली. त्यामुळे सरकारचे साडेतीन कोटी रुपये अक्षरश: पाण्यात गेल्याचे दिसत आहे. कामाच्या दर्जावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरण्यात येत आहे. 

कॉटेज कॉर्नरपासून तपोवन रस्ता औरंगाबाद महामार्गाला इंद्रायणी हॉटेलजवळ मिळतो. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले होते. आमदार संग्राम जगताप यांनी त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये मंजूर करून आणले. बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसात त्याचे तीन-तेरा वाजले. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज रस्त्याची पाहणी केली. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, दीपाली बारस्कर, विनित पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते. संपूर्ण रस्त्याचे काम नव्याने दर्जेदार करावे; अन्यथा बांधकाम अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. 


 
शासनाकडून विकासकामांना निधी लवकर मिळत नसताना आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र, बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केले. या कामाची चौकशी व्हायला हवी. तसेच, नव्याने रस्ता होईपर्यंत ठेकेदाराचे देयक अदा करू नये. 
- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, महापालिका 

तपोवन रस्त्याचे काम योग्य प्रकारे झालेले नाही. या भागात मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. त्यांना एमआयडीसीत जावे लागते. हा रस्ता त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ यावर असते. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबरीकरण वाहून गेले आहे. 
- गणेश डाके, नागरिक 


पॅचिंगचे कामही निकृष्ट 
भिस्तबाग महाल कॉर्नर, राधाकृष्णनगर, संत तुकारामनगर, जिल्हा परिषद शाळा, संभाजीनगर, पोलिस कॉलनी, डोकेनगर कॉर्नर, सूर्यनगर कॉर्नर, इंद्रायणी चौक भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविण्यास सुरवात केली असली, तरी पॅचिंगचे कामही निकृष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com