
अहिल्यानगर : बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या २० गुणांमुळे (प्रत्येक विषयांसाठी) विशेषत: दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही. पण, टक्केवारी जास्त मिळविण्यासाठी त्यांनी पाठांतरापेक्षा स्वत: नोट्स काढणे, उत्तरे वेळेत लिहिण्याचा सराव करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून अभ्यास, मनावर दडपण तथा भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर पोचणे, या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल, असा विश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे.