esakal | म्हणून नात आणि ७४ वर्षाच्या आजोबांच्या हस्ते केले ध्वजारोहण
sakal

बोलून बातमी शोधा

Flag hoisting by Vaishnavi Santosh Lahamge a girl who passed 10th in Rajur

वैष्णवी संतोष लहामगे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, घरकाम करून श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीची परीक्षा होऊन ८७ टक्के मार्क मिळवले. ती विद्यालयात प्रथम आली आहे.

म्हणून नात आणि ७४ वर्षाच्या आजोबांच्या हस्ते केले ध्वजारोहण

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : वैष्णवी संतोष लहामगे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, घरकाम करून श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीची परीक्षा होऊन ८७ टक्के मार्क मिळवले. ती विद्यालयात प्रथम आली आहे.

वैष्णवीच्या या गुणवत्तेचे कौतुक राजूर ग्रामस्थांनी केले. यामुळे त्यांनी आज चक्क तिच्या व आजोबांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे ध्वजारोहण केले. ७४ व्या स्वातंत्र्य दिनी तिचे ७४ वर्ष आजोबा व वैष्णवी दोघांनी झेंड्याची दोरी ओढली नी फुलाचा वर्षाव होत ते दोघांचे शिक्षकांनी स्वागत केले.

वैष्णवीला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटले. मात्र तिला डोळ्यातील आनंदाश्रु आवरता आले नाही. मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी त्या दोघांचे स्वागत केले. प्रसंगी बोलताना आजोबा रामनाथ माधव लहामगे म्हणाले माझ्या व नातीच्या हस्ते ध्वजवदन झाले. हे आमच्या सारख्या गरीब माणसांसाठी फार मोठी गोष्ट आहे. वयाची ७४ वीमध्ये मला व नातीला एकाच वेळी हा सन्मान मिळणे म्हणजे आमच्या आयुष्यातील दुर्मिळ घटना म्हणावी लागेल.

या शाळेला व शिक्षकांना विसरू शकणार नाही. तर वैष्णवी म्हणाली मला अचानक माझ्या मुख्याध्यापिकेचा फोन आला. उद्या शाळेत आजोबांना घेऊन ये तुमच्या हस्ते शाळेचे ध्वजवदन करायचे आहे. मी इतकी छोटी ना आमदार ना अधिकारी माझ्या हस्ते कसे काय? मला प्रथम नंबरपेक्षा हा मन व सन्मान मिळाला. हा माझ्या पुढील आयुष्यात कायम स्मरणात राहील.

मी माझ्या शाळेला व शिक्षकांना कधीच विसरणार नाही. देशाची एक नागरिक म्हणून देशासाठी, शाळेसाठी माझ्या गावसाठी मी काही तरी करून दाखवीन, असा विश्वास तिने व्यक्त केला. सामाजिक अंतर राखत मास्क लावून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

संपादन : अशोक मुरुमकर