

शिर्डी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून साई मंदिरात फुले, हार व प्रसाद नेण्यास सुरुवात झाली. साईभक्त आणि फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा आहे. सुरुवातीला साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या पतपेढीद्वारे हार व प्रसाद विक्री सुरू करण्यात आली. लवकरच अन्य दुकानदारांना ही विक्री व्यवस्था सुरू करता येईल. भाविकांची लुटमार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.