चुलत्यावर अंत्यसंस्कार करून लंके पुन्हा कोविड सेंटरमध्ये! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 लंके कोविड सेंटर

आमदार लंके यांनी लगेच रात्री बारा वाजता भाळवणी येथे कोविड सेंटरमध्ये येऊन रूग्णांची माहिती घेऊन चौकशीही केली.

चुलत्यावर अंत्यसंस्कार करून लंके पुन्हा कोविड सेंटरमध्ये!

पारनेरः आमदार नीलेश लंके यांनी कोविड सेंटरसाठी वाहून घेतले आहे. ते घरीही जात नाहीत, तेथेच मुक्कामास असतात. लंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र, कोरोना काळात केलेल्या कामामुळे त्यांचे सर्वच पक्षांतून कौतुक होत आहे.

काल त्यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे निधन झाले. रात्री उशिरा लंके यांनी चुलत्याचे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर ते लगेच रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये रूग्णांच्या सेवेसाठी उपस्थित राहिले. (Forgetting grief over the death of his cousin, MLA Lanke is back on duty)

हेही वाचा: खताचे दर कमी केल्याने "जाणता राजां"ची श्रेयाची संधी हुकली!

चुलत्याच्या निधनाचे दुःख बाजूला सारून सामाजिक बांधिलकीचा विचार करून त्यांच्या या वर्तनाचे तालुक्यातून तसेच रूग्णांमधून कौतूक होत आहे.

लंके यांच्या चुलत्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येत फरक जाणवत होता. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार होते. मात्र, नंतर त्यांची फुफ्फुस निकामी झाल्याने बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. रात्रीच उशिराने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या नंतर आमदार लंके यांनी लगेच रात्री बारा वाजता भाळवणी येथे कोविड सेंटरमध्ये येऊन रूग्णांची माहिती घेऊन चौकशीही केली. रात्रीच तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य यंत्रणेशी चर्चा केली.

चुलत्यांच्या मृत्यूचे दुःख आहे. मात्र, कोविड सेंटरमध्ये कोरोनाशी लढा देणाऱ्या माझ्या या जनतेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? जनता हेच माझे कुटूंब आहे. या कुटूंबाची काळजी कुटूंबप्रमुख म्हणून घेणे ही माझी जबाबदारी आहे, असेही लंके यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.(Forgetting grief over the death of his cousin, MLA Lanke is back on duty)

loading image
go to top