esakal | स्वस्त सोन्याची महागडी कथा; स्वस्त सोन्याच्या आमिषाच्या लूटीने कलंकित झालेला श्रीगोंदे पुन्हा चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

A form of fraud in Shrigonda taluka claiming to give gold at low prices

'सोने सापडले असून ते स्वस्तात द्यायचे आहे' अशा आमिषाचा निरोप पेरला जायचा. सोन्याचा मोह कुणाला नाही शिवाय ते स्वस्तात मिळतेय असे नुसते समजले की शहरातील लोक श्रीगोंद्यातील ठराविक गावाच्या दिशेने चालू लागायचे. येथे आल्यावर अगदी सफाईदारपणे त्या व्यक्तीला लूटले जायचे.

स्वस्त सोन्याची महागडी कथा; स्वस्त सोन्याच्या आमिषाच्या लूटीने कलंकित झालेला श्रीगोंदे पुन्हा चर्चेत

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : 'सोने सापडले असून ते स्वस्तात द्यायचे आहे' अशा आमिषाचा निरोप पेरला जायचा. सोन्याचा मोह कुणाला नाही शिवाय ते स्वस्तात मिळतेय असे नुसते समजले की शहरातील लोक श्रीगोंद्यातील ठराविक गावाच्या दिशेने चालू लागायचे. येथे आल्यावर अगदी सफाईदारपणे त्या व्यक्तीला लूटले जायचे.

काही जणांचे यात खूनही झाला. काहीच लूटले गेलेले पोलिसात गेले अन्यथा बहुतेक लूटीने काळे तोंड झालेले परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यात निव्वळ धोका आहे हे माहिती असून या मोहात आजपर्यंत हजारो लोक फसले. आता ही फसण्याची वेळ लूट करणाऱ्यांवर आल्याने स्वस्त सोन्याची श्रीगोंद्याची महागडी कथा पुन्हा चर्चेत आली.

गेली २५ वर्षे झाली श्रीगोंदे तालुक्यातील मोजक्या गावांच्या हद्दीत सोन्याच्या मोहजालात गुंतवून बड्यांना लूटले जात आहे. निमगावखलू, सांगवीदुमाला, काष्टी, कोळगाव, सुरेगाव, विसापुरफाटा, लोणीव्यंकनाथ या गावांची हद्द प्रामुख्यांने या लूटीचे केंद्रस्थाने राहिली आहेत. पैशावाल्या पार्टीच्या घरापर्यंत एक निरोप पेरणारी म्हणजे मार्केटिंग करणारी गुन्हेगारांची टीम आहे.

'खोदकाम करताना (घर,जूना वाडा असे संदर्भ) सोन्याचा हंडा सापडला आहे. ते सोने गुपचुप विकायचे असून हा व्यवहार स्वस्तात होईल' अशी बतावणीचा निरोप दिला जायचा. पार्टी पटली की त्यांना काही खरे सोने दाखविले जायचे. मग व्यवहारासाठी स्थळ निश्चित करताना ते गावाकडे व निर्जनस्थळ असेल याची काळजी घेतली जाते. सोने घेण्यासाठी लोक येताना घरातील महिलांना घेवून येतात यापेक्षा अजून दुर्देव कुठले. मग पैसे घेतले जावून त्यांच्या हाती खोटे सोन्याची पिशवी द्यायची. त्यांना काही समजण्यापुर्वीच दबा धरुन बसलेले लोक हल्ला करुन त्या बड्यांना सोन्याऐवजी मारहाण करुन पिटाळून लावातात. यातील मोजकेच लोक पोलिसांपर्यत जातात अन्यथा बहुतेक लोक परतीच्या प्रवासाला लागून तेरी भी चुप... अशी भुमिका घेतात.

या लूटीत काही वर्षांपुर्वी काही प्रतिष्ठीत आणि पोलिसही मध्यस्थीच्या भुमिकेत होते. त्यावेळी आरोपी थेट आरोप करायचे आम्ही कष्ट घेतो मात्र खरी कमाई पोलिस आणि मध्यस्थांनाच जाते. या प्रकरणी काही पत्रकारांनी मध्यस्थ व दलालांच्या चौकशीसाठी उपोषण केले. त्यावर सीआयडी चौकशीचा आदेशही झाला. चौकशीसाठी नेमलेले अधिकारी लिलाधर नेमाडे यांना तेलगी प्रकरणात अटक झाली. त्यानंतर नेमलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी घरगुती कारण दाखवून तपास सोडला. त्या प्रकरणाचे पुढे नेमके काय झाले हे कुणालाही समजले नाही.

संपादन : अशोक मुरुमकर