
अहिल्यानगर : आर्थिक कारणावरून एकाचे अपहरण करून काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धमकी देऊन बळजबरीने नोटरी करून घेतल्याची घटना १२ मे रोजी दुपारी तीन ते १७ मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान नगर ते सोलापूर रोडवरील मुठ्ठी चौक सर्कल पुलाजवळ घडली. या प्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ९ जणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.