esakal | दिलीप गांधींच्या अंत्यविधी प्रकरणाची होणार चौकशी, मंत्री तनपुरेंची माहिती

बोलून बातमी शोधा

Former minister Dilip Gandhi's funeral will be investigated

जिल्हा प्रशासनाने अंत्यविधीतील संख्येवर मर्यादा घातली आहे. गांधी यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवल्यानंतर शहरातून मुख्य मिरवणूक मार्गाने नेण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.

दिलीप गांधींच्या अंत्यविधी प्रकरणाची होणार चौकशी, मंत्री तनपुरेंची माहिती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्यावर नेमके कोठे अंत्यसंस्कार होणार  दिल्लीत की नगरमध्ये... याविषयी संभ्रम होता. परंतु कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या आग्रहानंतर त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी नगरमध्ये अंत्यसंस्कार झाले.

जिल्हा प्रशासनाने अंत्यविधीतील संख्येवर मर्यादा घातली आहे. गांधी यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवल्यानंतर शहरातून मुख्य मिरवणूक मार्गाने नेण्यात आले. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.

गांधी तीनदा खासदार व एकदा राज्यमंत्री राहिले होते.त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. त्यांच्या नातेवाईकांनीही तशी मागणी केली होती. मात्र, प्रशासानाने दखल घेतली नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

तीनदा खासदार, राज्यमंत्री असलेले स्व. दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 
राज्यमंत्री तनपुरे यांनी गांधी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. ऍड. अभिषेक भगत यांनी स्व. दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याकडे मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले. त्यावर तनपुरे म्हणाले, याबाबत आपण चौकशी करणार आहोत. 
तनपुरे यांनी सुवेंद्र गांधी यांच्याशी संवाद साधला.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, अंबादास गारुडकर उपस्थित होते. 

माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गांधी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी शहराध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते. 

यांना रोखणार कोण

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आहे. छुुप्या पद्धतीने लग्न सोहळे सुरू आहेत. हॉटेल, चौपाटीवरील गाड्या ग्राहकांनी फुल्ल भरलेल्या असतात. दुकानांतही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा असतो. कालच एका व्यावसायिकाने काढलेल्या ट्रीपमधील दीडशेजण बाधित असल्याचे आढळून आले आहे. ही स्थिती कायम राहिली तर पुन्हा एखदा लॉकडाउनला सामोरे जावे लागू शकते.