माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची अचानक कोविड सेंटरला भेट

नीलेश दिवटे 
Monday, 31 August 2020

राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी अचानकपणे येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली. येथे उपचार घेत असलेल्यांची आरोग्यसेवा व मिळत असलेल्या सुविधा बाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली.

कर्जत (अहमदनगर) : राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी अचानकपणे येथील कोव्हिड सेंटरला भेट दिली. येथे उपचार घेत असलेल्यांची आरोग्यसेवा व मिळत असलेल्या सुविधा बाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. यानंतर येथे दिल्या जात असलेल्या सुविधाबाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना करीत समाधान व्यक्त केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी प्रेरणा पाटील, परिचारिक ठोसर आदी उपस्थित होते.

सहा महिन्यांपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याला तालुका अपवाद नाही. सध्या  तालुक्यातील कोरोनाबाधित ७० रुग्ण सदर क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. माजी मंत्री  शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयातील कोरोना सेंटरला अचानक भेट दिली. येथे क्वारंटाईन असलेल्या रूग्णांशी येथे मिळत असलेल्या सुविधाबाबत चर्चा केली. 

यावेळी तालुक्यातील दोन हजार ८५ संशयितांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. यापैकी ५४७  रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ४३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र या महामारीत दुर्दैवाने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ७४ रूग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. हे सर्व जण ठिक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी यावेळी दिली. यावर राम शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

माजी मंत्री प्रा. शिंदे म्हणाले, कोरोना हे जागतिक महामारीचे संकट आहे याचा सर्वांनी धीराने सामना करा. यावर विना मस्क फिरणे टाळा. फक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. सानिटायझरचा वापर करीत सोशल डिस्टन्स पाळा तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्यातरी हाच एकमेव उपाय आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister Ram Shinde suddenly visited the Kovid Center