अण्णासाहेब म्हस्केही झाले बिनविरोध, कोण आहेत ते

Former MLA Annasaheb Mhaske also became unopposed
Former MLA Annasaheb Mhaske also became unopposed
Updated on

शिर्डी ः जिल्हा बॅंक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निमित्ताने तालुक्‍यातील सहकारी सेवा संस्थांवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिध्द केले. तसेच जिल्हा बॅंक निवडणुकीत खाते देखील उघडले. 

विखे परिवाराच्या निकटवर्तीय असलेले म्हस्के हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार झाले होते. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील व तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्याने त्यांना जलसंपदा विभागाचे राज्यमंत्रीपद देखील मिळाले होते.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा कार्यकाल प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी त्यांना सदैव साथ दिली. कायद्याचे पदवीधर असलेले म्हस्के हे शेती व सहकारातील जाणकार नेते म्हणून ओळखले जातात.

जिल्हा सहकारी बॅंकेत त्यांना सलग दुसऱ्यांदा संचालकपदाची संधी देण्यात आली. त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

या वेळी डॉ. अभिजित दिवटे उपस्थीत होते. 
शिर्डी विधानसभा मतदार संघात मतदानाचा अधिकार असलेल्या 73 संस्था आहेत. त्यापैकी 68 संस्था विखे गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळे माजी आमदार म्हस्के यांनी जिल्हा बॅंकेतील निवड निश्‍चित समजली जात होती. 

आता केवळ औपचारिकता बाकी ः विखे पाटील 

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. आम्ही त्यांना सलग दुसऱ्यांदा जिल्हा बॅंकेवर संधी देण्याचा निर्णय घेतला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने या निर्णयास पाठबळ दिले. ग्रामपंचायत निवडणुकांपाठोपाठ जिल्हा बॅंकेत मिळविलेले हे यश समाधान देणारे आहे, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com