एकनाथ खडसेंचा पक्षाला फटका बसणारच : भाजपच्या माजी आमदाराची कबुली

दत्ता इंगळे
Saturday, 24 October 2020

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंमुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार असला तरी भाजप हा मोठा पक्ष आहे.

अहमदनगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंमुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार असला तरी भाजप हा मोठा पक्ष आहे. माझा कोणत्याही प्रकारचा खडसेंशी संपर्क नाही. मी आता भाजपातच आहे आणि अखेरपर्यंत भाजपातच राहणार, असल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये काल प्रवेश केला. त्यांनंतर त्यांचे समर्थक भाजपाला सोड चिट्ट देऊन राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये माजी आमदार कर्डिले यांचेही नाव होते.

माजी आमदार कर्डिले हे नाथाभाऊंचे कट्टर समर्थक आहेत. कर्डिले यांनी १० वर्षापूर्वी राष्ट्रवादीला सोडून खडसेमुळे भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपकडून ते दोनवेळा आमदार झाले. २०१९ च्या निवडणूकीत नगर- राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. कर्डिले हे खडसे यांचे समर्थक असल्यामुळे कर्डिले यांच्या भुमिकेबाबत उत्सुकता होती. मात्र, याला त्यांनी पूर्ण विराम दिला आहे. नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन झाले. दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला माजी आमदार कर्डिले यांनी उत्तर दिले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Kardile says Eknath Khadse party will be empact