माजी आमदार शिवाजी कर्डिलेंना पुन्हा व्याह्याचा टोमणा

दत्ता इंगळे
Friday, 18 December 2020

महाविकास आघाडीची संधी थोडक्‍यात हुकली. मात्र, आता ते माजी आमदार झाल्याने, तालुक्‍यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.

नगर तालुका ः शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने, त्यांचे नगर तालुक्‍यात काहीच अस्तित्व राहिलेले नाही, असा टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला. 

नगर तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात गाडे बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव दुसुंगे, कॉंग्रेसचे संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, इंजिनिअर प्रवीण कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, रोहिदास कर्डिले आदी उपस्थित होते. 

संदेश कार्ले म्हणाले, की ग्रामपंचायतीनंतर सेवा सोसायट्या, बाजार समिती व जिल्हा बॅंकेची निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या गत निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता.

महाविकास आघाडीची संधी थोडक्‍यात हुकली. मात्र, आता ते माजी आमदार झाल्याने, तालुक्‍यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही. जिल्हा बॅंक व बाजार समिती जिंकण्यासाठी ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Shivaji Kardile's criticism of Shashikant Gade