कोणीही विचलित होऊ नका; मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Former MLA Vaibhav Pitched has said that he is firmly with you

तालुक्‍यातील राजकीय बदलामुळे तरुणांना सुवर्णसंधी आहे. कुठलाही नेता फक्त जिवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो. या बदलांमुळे मी खचलोय, असा विचार मनात आणू नका. आपले कार्य पूर्ण ताकदीने सुरू ठेवा. मी खंबीरपणे आपल्यासोबत असल्याचे पिचड यांनी नमूद केले आहे.

कोणीही विचलित होऊ नका; मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : तालुक्‍यातील हालचालींमुळे कोणीही विचलित होऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असून, आणखी ताकदीने उभे राहण्याचा संकल्प कार्यकर्ते, मित्रांनी करावा,' असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह त्यांचे समर्थक आज मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना पिचड यांनी म्हटले आहे, की राजकारणात चढ-उतार सुरू असतात. या गोष्टींना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कधीही जास्त महत्त्व दिले नाही. मीही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय.

तालुक्‍यातील राजकीय बदलामुळे तरुणांना सुवर्णसंधी आहे. कुठलाही नेता फक्त जिवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळे मोठा असतो. या बदलांमुळे मी खचलोय, असा विचार मनात आणू नका. आपले कार्य पूर्ण ताकदीने सुरू ठेवा. मी खंबीरपणे आपल्यासोबत असल्याचे पिचड यांनी नमूद केले आहे.

loading image
go to top