मी आहे त्या घरी सुखी; माझ्याबाबत जाणीवपूर्वक केली जातेय चर्चा

शांताराम काळे
Monday, 17 August 2020

मी आहे त्या घरी सुखी आहे, माझ्याबाबत जाणीवपूर्वक उठविलेल्या त्या वावड्या आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.

अकोले (अहमदनगर) :मी आहे त्या घरी सुखी आहे, माझ्याबाबत जाणीवपूर्वक उठविलेल्या त्या वावड्या आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.

भंडारदरा येथील जलपूजनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यानी हे वक्तव्य केले. मध्यतंरी वेगवेगळ्या चॅनलवर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा घरवापसी सुरु होणार राष्ट्रवादीचे नेते वैभव पिचड यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरु असे पिचड यांचे छायाचित्र टाकून बातम्या चालविल्या जात होत्या. याबाबत पत्रकारांनी त्याचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, काही चॅनलवर माझा फोटो टाकून घरवापसी करणार, असे सांगून बातमी चालवली होती. मात्र माझ्याशी कुणीही संपर्क केला नाही व माझा ही कुणाशी संपर्क झाला नाही. मी आहे त्या घरात सुखी आहे.

याबाबत संबंधित चॅनललाही मी माझी प्रतिक्रिया दिली आहेसरकारने आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असून पर्याटन व्यवसाय बंद असल्याने या परिसरातील तरुणांना रोजगार नाही. पाच महिने घरात बसून असल्याने खाण्याचे प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यासाठी शासनाने खावटी तातडीने द्यावी. या भागातील बेरोजगारांना पँकेज द्यावे. यापूर्वी सरपंच परिषदेने मागणी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Vaibhavrao Pichad said I have no intention of leaving the NCP