esakal | पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Former President of Pune University Board of Studies Ashok Shinde passes away

प्राचार्य डॉ. शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पंधरा वर्षे मराठी अभ्यास मंडळाचे काम पाहिले. त्यातील पाच वर्षे त्यांनी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे यांचे निधन

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोक भीमराज शिंदे (वय 65) यांचे आज (ता. 18) दुपारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे. 

प्राचार्य डॉ. शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पंधरा वर्षे मराठी अभ्यास मंडळाचे काम पाहिले. त्यातील पाच वर्षे त्यांनी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 18 विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर 15 जणांनी एम.फिल. पदवी मिळविली.

नेवाशातील ज्ञानेश्वर महाविद्यालयात एनसीसीचे कॅप्टन म्हणून पंधरा वर्षे काम केले. बहि:शाल शिक्षण मंडळाचे वक्‍ते म्हणून त्यांनी पंचवीस वर्षे काम केले. ज्ञानेश्वर महाविद्यालयात तीन, तर सोनई येथील कला महाविद्यालयात दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

सध्या ते भोसरी (पुणे) येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सेवेत होते. डॉ. शिंदे यांनी विविध विषयांवर दहा पुस्तके लिहिली, तसेच सतरा पुस्तके संपादित केली. नगर येथे झालेल्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

loading image
go to top