माजी केंद्रीय राज्यमंत्री गांधी यांच्यावर नगरमध्येच होणार अंत्यसंस्कार

Former Union Minister of State Gandhi will be cremated in Ahmednagar
Former Union Minister of State Gandhi will be cremated in Ahmednagar

अहमदनगर ः माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या काल पहाटे दिल्लीत उपचार घेत असताना निधन झाले होते. कोरोनाची लागण झाल्याने ते दिल्लीत उपचार घेत होते. परंतु अचानक तब्येत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनी दुःख व्यक्त केले. गांधी यांच्या पार्थिवावर नेमके कोठे अंत्यसंस्कार करायचे याविषयी काल उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता. काही नातेवाईक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा अंत्यविधी नगरच्याच भूमीत व्हायला हवा, असा सूर होता. त्यामुळे रात्री अंत्यविधी नगर येथेच करायचे ठरले. 

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ही स्थिती उदभवली होती. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून अॅम्ब्युलन्सद्वारे आणले जात आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ते नगरला येण्याची शक्यता आहे. अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

अंत्यसंस्कार मार्ग असा आहे

खासदार दिलीप यांचे पार्थिव त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर गुरूदेव आनंदऋषीजी समाधी, बुरूडगाव रस्त्यामार्गे, छत्रपतशिवाजी महाराज पुतळा, हायवेवरून मार्केट यार्ड चौक, बंगालचौकी, बांबू गल्ली, चर्चा रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, नवी पेठ, नेता सुभाष चौक, भाजप कार्यालय, आनंदी बाजार, नालेगाव मार्गे अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जातील.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी अंत्ययात्रेसाठी केवळ २०जणांचीच परवानगी दिली आहे. गांधी हे राजकीय नेते असल्याने मोठा जमाव जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अंत्ययात्रा काढण्यास परवानगी दिली की नाही, याबाबत समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com