esakal | लसीकरण मोहीम मतदानासारखी राबवावी : सुजित झावरे

बोलून बातमी शोधा

लसीकरण मोहीम मतदानासारखी राबवावी : सुजित झावरे

झावरे म्हणाले, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण आहे, ते वेगात होण्याची आवश्यकता आहे.

लसीकरण मोहीम मतदानासारखी राबवावी : सुजित झावरे

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : ग्रामीण भागात जेष्ठ नागरिकांना आधुनिकतेचा वापर करण्यास अडचणी येतात. मोबाईल द्वारे नाव नोंदवा मह तारखेनुसार लसीकरणास जाणे ही प्रक्रिया किचकट आहे. निवडणूकीतील मतदान प्रक्रियेप्रमाणे गावात केंद्र स्थापन करून वार्ड वाईज लसीकरण केल्यास ही मोहीम अजुन वेगात होईल, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.

वासुंदे(ता.पारनेर) येथे आरोग्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प घेण्यात आला. त्यावेळी झावरे बोलत होते. यावेळी अमोल साळवे, डॉ.संदीप देठे, उपसरपंच शंकर बर्वे, विमल झावरे, बाळासाहेब शिंदे, भाऊसाहेब सैद, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, लहानभाऊ झावरे, दिनकर झावरे उपस्थित होते.

झावरे म्हणाले, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण आहे, ते वेगात होण्याची आवश्यकता आहे. वासुंदे पासुन खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर बारा किमी आहे. जेष्ठ नागरिकांना तेथे जाण्यासाठी दळणवळणाची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संदीप सांगळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा कॅम्प आयोजित करण्यासाठी सहकार्य केले.