
जामखेड : कॅनरा बँकेच्या जामखेड शाखेत बनावट सोने तारण ठेवून १७ लाख ७३ फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींना जामखेड न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर अण्णासाहेब कोल्हे व खातेदार मुनावर पठाण, दिगांबर आजबे व अनिता जमदाडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कॅनरा बँकेच्या जामखेड शाखेचे व्यवस्थापक आनंद बाबासाहेब डोळसे यांनी फिर्याद दिली आहे.