
अहिल्यानगर : शिर्डी येथील चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचा प्रकार आज समोर आला. अशोक बोरसे, सारंगधर वाघमारे, प्रवीण घोरपडे, इसाक शेख अशी या भिक्षेकऱ्यांची नावे आहेत. त्यांना विसापूर (ता. श्रीगोंदे) येथील बेगर होममध्ये ठेवण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय आणि विसापूर बेगर होम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे.