पुणे महापालिकेला राळेगणसिद्धीच्या महिला बचत गटाकडून चार बस भाड्याने

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

महिला बचत गटामार्फत पुणे महापालिकेला बस किलोमीटरप्रमाणे भाड्याने देण्याचा उपक्रम खूप स्तुत्य आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : महिला बचत गटामार्फत पुणे महापालिकेला बस किलोमीटरप्रमाणे भाड्याने देण्याचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. त्यातून महिलांमधून उद्याचे उद्योगपती तयार होतील, असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केला.

राळेगणसिद्धी येथे नुकतेच या चार बसचे अनावरण हजारे यांच्या हस्ते झाले. हजारे म्हणाले, अशा उपक्रमातुन महिला अधिक स्वयंपूर्ण होतील. यावेळी दादा पठारे, गणपत मापारी, बाळासाहेब मापारी, डॉ. गणेश पोटे, गणेश हजारे, देविदास मापारी, सदाशिव पठारे, कारभारी पोटघन, गणेश मापारी, अशोक डोळस, डॉ. बाळासाहेब पठारे, सुरेश पठारे, लाभेष औटी, दादाभाऊ पठारे, जयसिंग मापारी आदींसह महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होते.

जातेगाव, पळवे, राळेगणसिद्धी येथील या बचतगटांमार्फत पुणे महापालिकेला चार बस भाडे तत्त्वाने सुपूर्द करण्यात आल्या असल्याची माहिती माजी सैनिक दादा पठारे यांनी दिली. या सर्व बस पुण्यात कात्रज बस डेपोला चालणार आहेत. 

एका बचत गटात 11 महिलांचा समावेश आहे. राळेगणसिद्धी, जातेगाव व पळवे या गावातील एकूण 44 महिलांचा बचत गट आहे. महिला बचत गटांना सैनिक कल्याण विभागाकडून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
- दादा पठारे, माजी सैनिक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four buses hired by Pune Municipal Corporation from Ralegan Siddhi Women Self Help Group

टॉपिकस
Topic Tags: