Breaking : मुंबईतून भाजीपाला विकून गावाकडे परतत असताना चार तरुण शेतकऱ्यांवर काळाचा घाला

मार्तंड बुचुडे
Friday, 28 August 2020

करंदी येथील चार शेतकरी गुरुवारी (ता. 27) सायंकाळी मुंबई येथे टेम्पोमधून भाजीपाला विक्रीस घेऊन गेले होते.

पारनेर (अहमदनगर) : करंदी येथील चार शेतकरी गुरुवारी (ता. 27) सायंकाळी मुंबई येथे टेम्पोमधून भाजीपाला विक्रीस घेऊन गेले होते. भाजीपाला विकल्यानंतर शुक्रवारी (ता. 28 ) सकाळी त्याच वाहानातून मुंबई येथून परतत असताना आळे फाट्याजवळ वडगाव आनंद येथे सकाळी सव्वापाच वाजणेच्या सुमारास त्यांच्या वाहानास समोरून आलेल्या मालट्रकने जोरदार धडक दिल्याने चालकासह तीन जण जागीच ठार झाले.

करंदी येथील चार तरूण शेतकरी करंदी येथून विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन मुंबईस विक्रीसाठी गेले होते. तेथे गुरुवारी भाजीपाला विकल्यानंतर ते आज सकाळी परतत असताना वडगाव आनंद जवळ सव्वापाच वाजणेच्या सुमारास त्याच्या गाडीला समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चालक सुरेश नारायण करंदीकर यांच्यासह पुढे बसलेला एक जण व मागे झोपलेले दोघेजण असे चारजण जागीच ठार झाले. या अपघातात चालक सुरेश करंदीकर (उघडे), सिद्धार्थ राजेश करंदीकर (उघडे), आकाश सुरेश रोकडे, सुनिल विलास उघडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

करंदी येथील हे चार तरुण मालवाहतूक वाहनाने मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेले होते. भाजीपाला विक्री करून आज सकाळी परतत असताना आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे हा आपघात झाला ही माहीती समजताच करंदीसह पारनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four farmers killed in an accident while coming to Karandi from Mumbai