
-विलास कुलकर्णी
राहुरी : शहरातील एका दाम्पत्याने राहत्या घरातील एका खोलीत काश्मीर येथील केशर शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. नीलिमा चिंचकर व रामदास चिंचकर (रा.राहुरी, जि.अहिल्यानगर) असे प्रयोगशील दाम्पत्याचे नाव आहे. त्यांना केशर शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने एका नव्या प्रयोगाला उभारी मिळाली आहे.