Fraud : खरबूज उत्पादक शेतकऱ्याला सात लाखांचा गंडा; वाशीतील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

Fraud
Fraud

राहुरी : ‌तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगराळ भागातील एका शेतकऱ्याची आठ एकर खरबुजाची वाडी घेतलेल्या वाशी (नवी मुंबई) फ्रूट मार्केटमधील व्यापारी पिता-पुत्राने शेतकऱ्याची तब्बल सात लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Fraud
Ahmednagar : नगर जिल्ह्यातील लंगर सेवा डेन्मार्कच्या मानांकन यादीत; जगभरातून ऑनलाइन व्होटींग

दिनेशकुमार रामधन गुप्ता व अंकेत दिनेशकुमार गुप्ता (दोघेही रा. ओपन रोड, एपीएमसी फ्रूट मार्केट, सेक्टर १९, तुर्भे, वाशी, नवी मुंबई) अशी आरोपी व्यापाऱ्यांची नावे आहेत. शिवाजी सदाशिव काकडे (वय ४७, रा. शेरी-चिखलठाण) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की चिखलठाण येथे शेतजमीन आहे. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आठ एकर जमिनीत कुंदन खरबुजाची वाडी केली. मार्च २०२३ मध्ये खरबूज काढण्यास तयार झाले. चार वर्षांपूर्वी वाशी मार्केटमधील व्यापारी दिनेशकुमार गुप्ता यांना खरबूज विकले होते, तेच व्यापारी २० मार्च २०२३ रोजी त्यांचा मुलगा अंकेत समवेत चिखलठाण येथे माझ्या घरी आले. दुसऱ्या दिवशी खरबूज वाडीची पाहणी करून व्यवहार ठरला.

आठ एकर खरबुजाच्या वाडीची किंमत १५ लाख रुपये ठरली. प्रत्येक सोमवारी पाच लाख रुपये द्यायचे. तीन आठवड्यांत खरबूज काढून घ्यायचे, असा लिखित व्यवहार झाला. खरबूज काढणीला सुरवात झाल्यावर व्यापाऱ्याने पहिल्या सोमवारी पाच लाख रुपये बँक खात्यावर वर्ग केले. पुढच्या सोमवारी फक्त दीड लाख पाठवले. तिसऱ्या सोमवारी पुन्हा फक्त दीड लाख पाठविले. असे एकूण आठ लाख रुपये दिले.

Fraud
Devendra Fadnavis : "ज्यांच्या घरात पोरगा नाही ते ही.." कर्नाटकच्या पराभवानंतर फडणवीस 'त्या' नेत्यांवर बरसले

दरम्यान, तीन आठवड्यांत व्यापाऱ्याने सर्व आठ एकरांवरील खरबूज नेले. उर्वरित सात लाखांसाठी व्यापाऱ्याला वेळोवेळी मोबाईलवर संपर्क करून विचारणा केली, परंतु पिता-पुत्राने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरवात केली. व्यापाऱ्याने माल नेऊन विश्वासघात केला. सात लाखांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

"खरबुजाची आठ एकरची वाडी कष्टाने उभी केली. शंभर टनांपेक्षा जास्त खरबूज माल व्यापाऱ्याने शेतातून काढला. व्यवहारात सात लाखांची फसवणूक केली. उधारीवर खते औषधे घेतली. वाटेकरी आहे. शेतीवर प्रपंच आहे. हतबल झालो. अशाच कारणांनी शेतकरी आत्महत्या करतात. पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा."

- शिवाजी काकडे, शेतकरी, शेरी-चिखलठाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com