esakal | जामखेडमध्ये ज्येष्ठांसाठी मोफत मोबाईल क्लिनिक! कुणी केलं हे... रोहित पवार दुसरं कोण?

बोलून बातमी शोधा

Free mobile clinic for seniors in Jamkhed!}

जामखेड आणि कर्जत तालुक्यात आमदार रोहित पवार यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. मोबाईल क्लिनिक या त्यातीलच एक.

जामखेडमध्ये ज्येष्ठांसाठी मोफत मोबाईल क्लिनिक! कुणी केलं हे... रोहित पवार दुसरं कोण?
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : आमदार रोहित पवारांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या रक्तदाब, मधुमेह व इतर आजाराची तपासणी करून मोफत प्राथमिक उपचार करण्यासाठी 'मोबाईल क्लिनिक' सुरू केले आहे. वयाची पंचेचाळीसी ओलांडलेल्यांसाठी ही आरोग्य सेवा मोफत दिली जाणार आहे. 'मोबाईल क्लिनिक' सोबत 'तज्ञ' डॉक्टरांची टीम राहणार आहे. ही सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. 

सोमवारी (ता.01) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, एच.डी.एफ.सी बँकेच्या सहकार्यातून आमदार रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात मोफत ए.आय. एक्सरे व सी‌.बी.सी रक्त चाचणीस प्रारंभ केला. मोबाईल क्लिनिक'' चा प्रारंभ जामखेड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला.

तालुक्यातील 87 गावांमध्ये पुढील महिनाभरात ''मोबाईल क्लिनिक''च्या माध्यमातून तपासण्या करुन मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून ४५ वर्षांच्या पुढच्या लोकांसाठी ही आरोग्य सेवा मोफत दिली जाणार आहे. तज्ञ डॉक्टरांची टीम ''मोबाईल क्लिनिक'' सोबत राहणार आहे. ''मोबाईल क्लिनिक'' ही आरोग्य सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य वाहिणी वरदान ठरेल..!

यांची होती उपस्थिती

प्रा. मधुकर राळेभात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, दिगांबर चव्हाण, वैजनाथ पोले, प्रकाश सदाफुले , पवन  राळेभात, उमर कुरेशी, प्रकाश काळे, हरिभाऊ आजबे, राजेंद्र शिंदे ,अमीत जाधव, बाबासाहेब मगर, इस्माईल सय्यद, सचिन शिंदे, प्रशांत राळेभात,महेश राळेभात, अमोल गिरमे, प्रा. राहुल अहिरे उपस्थित होते.                         संपादन - अशोक निंबाळकर