esakal | शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त नेवाशात मोफत शिवभोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Free Shiva meal in Nevasa on the occasion of Shiv Sena chief memorial day

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नेवासे शहरात मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त नेवाशात मोफत शिवभोजन

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नेवासे शहरात मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले.

प्रारंभी युवा नेते अनिल ताके,  शिवभोजन थाळी सेंटरचे चालक विलास गरुड व  गोरख घुले यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुमारे दीडशे-दोनशे गरजूंनी मोफत शिव भोजनाचा लाभ घेतला. बहुजन समाजाचे नेते पोपट जीरे, नगरसेवक फारूक आतार,   सुधीर चव्हाण,  सुनील जाधव,  सुलेमान मनियार,  युसूफ बागवान, मुन्ना आत्तार, मोसीन आतार, अन्सार शेख आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर