लग्नात मित्रांचा कधी अंदाजच येत नाही; कोण कसं नाचतंय बघाच : Video

अशोक मुरुमकर
Friday, 11 September 2020

मित्राचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरगुती एखादा कार्यक्रम! त्यात मैज मस्ती आलीच. लग्नात तर पूर्वीपासून बँडला महत्त्व आहे.

अहमदनगर : मित्राचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरगुती एखादा कार्यक्रम! त्यात मैज मस्ती आलीच. लग्नात तर पूर्वीपासून बँडला महत्त्व आहे. आता त्याची जागा डीजेनी घेतली. त्यात हवं ते गाण लावता येत. सध्या वाढदिवसाला सुद्धा डीजे लावला जातो. अशा कार्यक्रमात तरुणाई मनसोक्त नाचते. मुली सुद्धा ठेका धरतात. त्यात कोण कसं नाचेल याचा काही कधी कोणाला पत्ता लागत नाही. अशाच वेगवेगळ्या नृत्याचा संग्रह केलेल्या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.
 

पूर्वी लग्नात बँडबाजाला खूप महात्त्व होतं. लग्नात नवरदेव किंवा नवरी हळदीला पाठवताना सुद्धा काही ठिकाणी बँड वाजवण्याची प्रथा आहे. हळदीलाही वाजंत्रीवाले असतातच. एखदा हळद लागली की, तालात तरुणाई ठेका धरते. त्यात कोण कसे नाचेल याचा नेम नसतो. पूर्वी लग्नात बँड आणि आणि आरगण वाजवला जात आहे.

काही ठिकाणी हलगी वाजवली जात. पुढे डीजे आले. मात्र, हलगी वाजल्यानंतर काहींचा वेगळा ताल असतो. तर डीजेवर वेगळा व बँडच्या तालावर वेगळा डान्स असतो. पूर्वी काही ठिकाणी लग्नात वरधवा निघताना लेझीम, जहाज खेळली जाईचे.
नवं ते हवं याप्रमाणे लेझीम, जाहाज बंद झाले. त्याची जागा नृत्याने घेतली. यामध्ये कोण कसा नृत्य करेल याचा नेम नसतो. आणि अशाच नृत्याचा संग्रह सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नृत्याचे आठ प्रकार दाखवण्यात आले आहेत. सध्या विजयी मिरवणूक असेल किंवा गावांमध्य सार्वजनिक कार्यक्रम असला तरी अनेकजण ठेका धरतात. यामध्ये मराठी व हिंदी गाणी वाजवली जातात. यामध्ये जुन्या व नवीन रिमीक्स गाण्यांना ग्रामीण भागात मोठी मागणी असते. यातील काही नृत्यतर काहींच्या जिवावरही बेतल्याचे आपण पाहिले आहेत. 

 

काही दिवसांपूर्वी ‘लिंबू मला मारीलं...’ हे गाणं खूप चर्चेत आलं होतं. या गाण्यात तरुणाई नाचताना एकाला खाली झोपवायचे आणि लिंबू मला मारिले म्हटलं की, वर टाकायचे. यातून अनुचित प्रकार झाल्याचे काही घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर शित पेयच्या बाटल्या वर टाकल्या जायच्या त्यातूनही अनुचीत प्रकार घडले आहेत. वरची बाटली खाली पडताना काहीच्या डोक्यात पडल्याने जखमी झाले आहेत. यावर्षी मात्र, कोरोना व्हायरसमुळे धुमधडाक्यातील लग्नाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे काहींना लग्नाला येताही येत नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friends are never expected at a wedding