चिखली गावातील रस्त्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी - रामहरी कातोरे

आनंद गायकवाड 
Wednesday, 30 September 2020

कातोरे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात रस्ते व विद्युतीकरणाचे जाळे विणले गेले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेच्या 5054 अंतर्गतच्या निधीमधून तालुक्यातील चिखली ते वाडापूर रस्ता (18 लाख), वामन वस्ती ते चिखली रस्ता (10 लाख) तसेच सागर हासे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता ( 5 लाख ) असा एकूण 33 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व शॅम्प्रोचे चेअरमन रामहरी कातोरे यांनी दिली. चिखली येथे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभवेळी ते बोलत होते.

कातोरे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात रस्ते व विद्युतीकरणाचे जाळे विणले गेले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणास प्राधान्य दिले जात असून, धांदरफळ गटातही विविध कामांसाठी निधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या 5054 निधीमधून या रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून ग्रामस्थांची पक्क्या रस्त्याची सोय होणार आहे. कोरोना संकटातही मतदार संघातील वाड्या वस्त्यांच्या विकासकामाला मंत्री थोरात यांनी प्राधान्य दिले आहे. आगामी काळात तालुक्यातील वाडापूर व निमज येथे पूल बांधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे इंद्रजित थोरात यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गावात 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
आज चिखली येथे या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी भास्करराव सिनारे, आत्माराम हासे, विनोद हासे, सोमनाथ हासे, बाळासाहेब सहाणे, सागर हासे, बापू सहाणे, नितीन हासे, गणेश हासे, अशोक वामन, प्रवीण घोटेकर, सोमनाथ हासे, मनोज गाडेकर, अण्णा हासे, सुधीर मेमाणे, ग्रामसेवक सोनाली आंबरे, ठेकेदार सोमनाथ गिते, कॉन्ट्रक्टर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fund of Rs.33 lakhs has been sanctioned for roads in Chikhali village, informed Zilla Parishad Member and Chairman of Shampro Ramhari Katore