
अहिल्यानगर: अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या दोघांना तोफखाना पोलिसांनी पकडले. या कारवाईत आठ किलो गांजासह चार चाकी वाहन असा ६ लाख २७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सावेडी परिसरातील सोनानगर चौकातील विराम हॉटेल समोरील मोकळ्या जागेत मंगळवारी (ता. १५) रात्री ११ च्या सुमारास करण्यात आली.