जंगल की डम्पिंग ग्राऊंड?; नागापूर जंगल परिसर कचऱ्यामुळे बकाल

सुनील गर्जे 
Saturday, 31 October 2020

नेवासे- शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता. नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे.

नेवासे (अहमदनगर) : नेवासे- शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता. नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरास बकालपणा येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. घनदाट वनराई नटलेल्या या जंगलाला व परिसराला आता 'डंपिंग ग्राऊंड' म्हणून ओळखले जात आहे.

नेवासे-शेवगाव मार्गावर भानसहिवरे- सौंदळे शिवारा लागत असलेले नागापूर फाटा येथे परिसरात असलेल्या उजाड माळरानावर वन विभागाने 1985 साली 73 हेक्टर परिसरात वृक्षारोपण करून ती झाडे मोठ्या प्रयत्नांनी जागविली आज पस्तीस वर्षात या माळरान हजारो हिरवीगार वृक्षराजांनी व्यापले आहे. 

येथील जंगलात हरणांचे कळप, कोल्हे, लांडगे, ससे, मोरांसह अन्य वन्यपशु-पक्षी आहेत. या परिसरात मुबलक गावात, पाला असल्याने या भागात जनावरे, शेळ्या-मेंढया चराई साठी मोठ्या प्रमाणात असतात . दरम्यान गेल्या पाच-सहा वर्षांपासून या जंगलासह परिसराला अज्ञातांची नजर लागली असून येथे वृक्षतोड, गौंनखनिज चोरीचे प्रमाण तर वाढलेच आहे. मात्र यापरिसरात आता अज्ञातांकडून कचरा टाकला जात असल्याने येथे कचरा डेपो निर्माण झाला आहे.

अनेकजण रात्रीच्या सुमारास याठिकाणी कागद, कागदाचे पुट्टे, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या, लहान फरशीचे तुकडे, जुनी कपडे, काचांचे तुकडे आदीसह इतर टाकावू वस्तू व मृत जनावरे येथे मोठ्या प्रमाणावर टाकल्या जाता असल्याने येथे काचाऱ्यासह दुर्गधीचे साम्राज्य पसरत आहे.

जनावरांना धोका...
या जंगल परिसरात नेवासे-शेवगाव रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्यांना दुर्गधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय शेतक-यांची जनावरे, याठिकाणी चरायला सोडली जातात. त्यामुळे जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो. 

अज्ञातांकडून रात्रीअपरात्री याठिकाणी कचरा टाकला जात आहे. कचरा टाकणार्यांवर पाळत ठेवण्यात येत असून दिसताक्षणी कारवाई करण्यात येणार आहे.
- मुश्ताक सय्यद, प्रभारी वनपाल, नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage is dumped in Nagpur in Nevasa taluka