
सोनई : शनिशिंगणापूर येथे आज शनिअमावस्येनिमित्त दिवसभरात सहा लाख भाविकांनी शनिमूर्तीचे दर्शन घेतले. उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाही गर्दीचा ओघ टिकून होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री सोनई रस्त्यावरील एका वाहनतळात सुरू असलेल्या भंडाऱ्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भडका होऊन एक पोलिस कर्मचारी, एक देवस्थानचा कर्मचारी व चार भाविक जखमी झाले आहेत.