घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘का’ मिळाले यश

शांताराम काळे
Friday, 14 August 2020

आपल्या हक्काच्या मागण्यासाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

अकोले (अहमदनगर) : आपल्या हक्काच्या मागण्यासाठी केलेल्या घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. कारण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे.

घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी हक्काच्या मागण्या संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी केटी वेअर मधुन पाणी द्यावे इतर मागण्यासाठी सतत आंदोलन सुरू होते. मात्र सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने 5ऑगस्टला प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करत विद्युत निर्मिती बंद केली.

त्यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे व अशोक भांगरे यांनी आंदोलनकर्त्याना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत लोकप्रतिनिधी अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य अभियंता अधिक्षक अभियंता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व सबंधित अधिकारी, देविदास खडके, लक्ष्मण गांगड यांच्यात बैठक झाली.

आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती देविदास खडके यांनी दिली. या आदिवासी शेतकरी प्रकल्प ग्रस्त शेतकरी आंदोलन कर्त्यानी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुरावा मिळालेले यश आहे धोंडीबा सोंगळ यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ghatghar project affected tribal farmers movement was a success