
-नायक दरंदले
सोनई : बाजारू गाव म्हणून हिणवण्यात येत असलेल्या घोडेगावात (ता. नेवासे) आठवड्यातील तीन दिवस सुरू झालेला कांदा लिलाव गाव आणि परिसरासाठी बरकता देणारा ठरत आहे. येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध असतानाच आता येथील कांदा लिलावात नऊ महिन्यांत ४१ लाख ४१ हजार ४७२ गोण्यांची आवक होऊन ४७० कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.