esakal | रोहितदादांच्या वाढदिवशी दादासाहेबांची अनोखी भेट, कोविड सेंटरला दोन लाखांची रक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

A gift of two lakh rupees from Dadasaheb Thorat

दादासाहेब थोरातांसारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या व्यवसायात यश मिळविल्यानंतर सामाजिक जाणिवेतून मदत देणे कौतुकास्पद आहे. युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेली मदत महत्वाची आहे.

रोहितदादांच्या वाढदिवशी दादासाहेबांची अनोखी भेट, कोविड सेंटरला दोन लाखांची रक्कम

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत :आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हिडं सेंटरला सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दादासाहेब थोरात यांनी दोन लाखाची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आमदार पवार यांचे हस्ते वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सुचेता यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या वेळी सभापती अश्विनी कानगुडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, उपसभापती हेमंत मोरे, माजी सभापती नानासाहेब निकत, युवा नेते ऋषिकेश धांडे, सुनील शेलार, विजय नेटके, राहुल नेटके, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, दादासाहेब थोरातांसारखे सामाजिक कार्यकर्ते आपल्या व्यवसायात यश मिळविल्यानंतर सामाजिक जाणिवेतून मदत देणे कौतुकास्पद आहे. युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेली मदत महत्वाची आहे. इतरांनी हा आदर्श पुढे ठेवावा.
दादासाहेब थोरात म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरीत आहोत. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्वकष्टातून वेगळी भेट दिल्याचे समाधान आहे.

रोहितदादांसाठी सरसावले कार्यकर्ते

कोव्हिडं सेंटरमधील सुविधेसाठी मदत करण्यासाठी पुढे यावे. या आवाहनाला प्रतिसाद देत युवा कार्यकर्ते विजय नेटके यांनी अकरा हजार रोख तर राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, विजय नेटके आणि राहुल नेटके यांनी वीस वाफ घेण्याचे मशीन आणि पाणी तापविण्याचे दोन मोठे इलेक्ट्रॉनिक मशीन भेट म्हणून दिले.

संपादन - अशोक निंबाळकर