

अहिल्यानगर : लग्न समारंभासाठी आलेल्या नातेवाईक महिलेने लग्न घरातील ६४.७ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरी केलेल्या सोन्यापैकी सात तोळे सोने सोनाराला विकले, तर उर्वरित ५८ तोळे सोने घराजवळील पडीक जागेत पुरून ठेवले.
हा प्रकार सावेडी परिसरातील रेणावीकर शाळेच्या मागे उदय हाऊसिंग सोसायटी येथे ८ ते ९ मार्च दरम्यान घडला. याप्रकरणी ॲड. निखिल बबन वाकळे (वय ३४, रा. उदय हौसिंग सोसायटी, सावेडी) यांनी सोमवारी फिर्याद दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा तपास करून आरोपी नातेवाईक महिलेला ताब्यात घेतले.