Ahmednagar : स्पर्धेतून खेळाडूंना चांगली संधी ; राधाकृष्ण विखे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakrishna Vikhe Patil

स्पर्धेतून खेळाडूंना चांगली संधी ; राधाकृष्ण विखे पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : जिल्हास्तरीय आमदार चषक टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना चांगली संधी मिळाली आहे. खेळाडूंचा सहभाग आणि उत्साह पाहता या स्पर्धेचा नावलौकीक वाढत आहे, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोणी बुद्रुक येथील मैदानावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने डे-नाईट जिल्हास्तरीय टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संपतराव विखे, यशवंत विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, उपसरपंच गणेश विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, अॅड. नितीन विखे, गणेश विखे, भाऊसाहेब विखे, भाऊसाहेब धावणे, राहुल धावणे, डॉ. राहुल विखे, रामभाऊ विखे, एस. पी. आहेर, एन. डी. विखे, संतोष विखे, अनिल विखे आदींसह ग्रामपंचायत, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि क्रिकेटप्रेमी मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.लोणी येथे जिल्हास्तरीय आमदार चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. मात्र, कोव्हीड संकटामुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

यंदा मात्र नियम शिथील झाल्याने मोठ्या उत्साहात या स्पर्धेचे आयोजन खासदर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्पर्धेतील पहीला सामना मोनेटा रेक्स आणि श्रीरामपूर वकील संघात खेळविण्यात आला. आमदार विखे पाटील पुढे म्हणाले, की या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी मिळाली असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूचा या स्पर्धेतील सहभाग महत्वपूर्ण आहे.

loading image
go to top