
पाथर्डी : तालुक्यातील तिसगाव येथील गोरक्षक भारत लिपारे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून, पुन्हा असा प्रकार घडल्यास ‘आम्ही जशास तसे उत्तर देऊ‘, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. लिपारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अजंठा चौकात जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन केले होते.