
नगर तालुका : मागील काही महिन्यांपासून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंग व बँकिंगमधील तांत्रिक कारणामुळे अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी करण्यासाठी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील लाभार्थी आले होते. नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नांतून तत्काळ प्रश्न सुटल्यामुळे सर्व लाभार्थ्यांसह गावातील नेत्यांनीही तहसीलदार शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनाचे कौतुक केल्याचा सुखद अनुभव आला.