ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता आमदार निधी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’साठी

अशोक मुरुमकर
Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘माझं कुटुंब माझी जाबाबदार कोरोनामुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या ‘माझं कुटुंब माझी जाबाबदार कोरोनामुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी (ता. १६) सरकारच्या सरकारच्या नियोजन विभागाने काढला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली आहे. अनेक निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्मीण झाली आहे. यातच कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र’ ही मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पथके तयार केली जाणार आहेत. त्यांना लागणारे आवश्‍यक साहित्य घेण्यासाठी आमदार निधीतून खर्च केला जाणार आहे. याबाबत काढण्यात आलेल्या

सरकार निर्णयात म्हटलं आहे की, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतील आरोग्य पथकांसाठी आवश्यक साहित्य देण्यात यावे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोविड १९ या विषाणू पासून होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबद्दल सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारकडून माझं कुटुंब माझे जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र ही राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येत आहे. 

या मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी स्थापन केलेल्या आरोग्य पथकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातील विधिमंडळ सदस्यांच्या मतदारसंघातील पथकांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत व कटक महामंडळात 25 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. 

त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य पथकाची स्थापना केली आहे. या आरोग्य पथकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. त्यातील परिछद 3 मध्ये नमूद केलेले आवश्यक साहित्य आमदार निधीतून उपलब्ध करून दिले जाणार आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कोविड १९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हास्तरावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी यापूर्वी २० लाख निधी सर्व आमदारांना उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार व शासन परिपत्रकानुसार सॅनिटाझर, इन्फ्रारेड थर्मामीटर,  फेस मास्क उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीच मान्यता दिली होतर. 

२० लाख निधीमधून झालेला खर्च जाऊन शिल्लक राहिलेला निधी उपलब्ध झाल्यास त्याचा विनियोग ‘माझं कुटुंब माझे जबाबदारी’ या राज्यव्यापी मोहिमेसाठी आरोग्य पथकांना द्यावा असे निर्णयात म्हटलं आहे. याशिवाय आणखी निधी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांना दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government decision to use MLA funds for my responsibility campaign