कोपरगाव : राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भेसळ रोखण्यासाठी लवकरच राज्यात नवा कायदा अस्तित्वात येईल. राज्यात दुधाला समान दर, एक राज्य- एक ब्रॅंड, एक जिल्हा -एक दूध संघ, एक गाव - एक दूध संस्था स्थापन करण्याबाबतची मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे. त्यावर शासन पातळीवर अभ्यास समिती नियुक्त करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी केले.