
कान्हुर पठार (ता. पारनेर) मधील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप माळी यांच्याकडे कान्हुर पठार ग्रामपंचायतचा अतिरिक्त भार असल्याने ते सातत्याने गावात उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामस्थांचे अनेक कामे रखडाली आहेत.
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता. पारनेर) मधील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप माळी यांच्याकडे कान्हुर पठार ग्रामपंचायतचा अतिरिक्त भार असल्याने ते सातत्याने गावात उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामस्थांचे अनेक कामे रखडाली आहेत.
ग्रामपंचायतीस पुर्ण वेळ ग्रामसेवक द्या, अन्यथा पारनेर पंचायत समिती समोर आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी किशोर माने व सभापती गणेश शेळके यांना ग्रामपंचायत सदस्या छाया ठुबे व अर्जुन नवले यांनी दिला आहे.
याबाबत माहीती अशी की,ग्रामविकास अधिकारी संदीप माळी यांच्याकडे तालुक्यातील हिवरे कोरडा व कान्हुर पठार ग्रामपंचायत अश्या दोन ग्रामपंचायतींचा भार आहे आहे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना राबविण्यात येतात मात्र ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने त्या राबविताना ग्रामपंचात प्रशासनास अडचण येत आहेत यामुळे पदधिकारी व ग्रामसेवक यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. या सोबतच गावातील गटार योजना, रस्ते सिमेंटीकरण, मुरमीकरण इतर विकासकामे यासंह ग्रामस्थांचे अनेक दैनंदिन कामे रखाडली आहेत. अनेक वेळा ग्रामसेवक उपलब्ध होत नाही.
लोकसंख्येने मोठे असणारे गाव असल्याने ग्रामस्थांची अनेक कामे ग्रामपंचायत मध्ये असतात मात्र पुर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहे.
ग्रामपंचायतीस पुर्ण वेळ ग्रामसेवक द्या अन्यथा पंचायत समिती समोर आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य ठुबे व नवले दिला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर