
शहरटाकळी : देशातील प्रत्येक व्यक्तीला अक्षरांची ओळख व्हावी, या उद्देशानं केंद्र सरकारनं साक्षरता अभियान सुरू केलं. या अभियानानं शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते, हे सिद्धही केलं. सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत दहिगावने (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत आगळीवेगळी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस बसलेले आजी-आजोबा पाहून साऱ्यांनाच कौतुक वाटले. शिकण्याची इच्छा असेल, तर वय आड येत नाही, हाच संदेश या आजी-आजोबांनी दिला.